Posts

गनिमी कावा आणि परोक्ष लढाईचे तंत्र !

गनिमी कावा आणि परोक्ष लढाईचे तंत्र :- टीप १: अपरोक्ष हा शब्द आपण बोली भाषेत एखाद्याच्या नकळत अशा अर्थें वापरतो. पण प्रत्यक्षात अपरोक्ष म्हणजे समोरासमोर . आणि परोक्ष म्हणजे आडून. एका भाषा तज्ञाने माझी चूक मला लक्षात आणून दिलीये. त्यानुसार मी लेख दुरुस्त केलाय. गनिमी कावा आणि छ. शिवाजी महाराज हे शब्द आज समानार्थी असल्यासारखे वाटतात नाही ? या गनिमी कावा या शब्दाची ओळख आपण सर्वाना साधारण इयत्ता चौथीच्या पुस्तकातून छ. शिवाजींचा इतिहास वाचताना होते . लहानपणी आम्ही भालजी पेंढारकरांचे ऐतिहासिक चित्रपट आवडीने पाहायचो . विशेषतः त्यात दाखवल्या जाणाऱ्या लढाया. एखादया गाफील मुघल छावणीवर बाजूच्या झाडा झुडपात लपून बसलेले मावळे एकदम "हर हर महादेव " ची ललकारी देत हातातील नंग्या बाकदार समशेरी तोलत तुटून पडत आणि कापाकापी करून गायब होत . याच प्रकारच्या लढाईला गनिमी कावा म्हणतात असा माझा बरेच दिवस समज होता . मुळात गनीम हा शब्द मूळचा फारसी आहे . त्याचा शब्दशः अर्थ शत्रू , लुटारू, डाकू . गनिमी म्हणजे शत्रूचा अशा अर्थाने बोली भाषेत हा शब्द रूढ झाला असावा . कावा म्हणजे डाव ,कपट युक्त कृती . ग